Chikhali : पादचारी महिलेचे दोन तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावले

एमपीसी न्यूज – पायी चालत जाणाऱ्या महिलेचे (Chikhali) दोन तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावले. हि घटना ताम्हाणे वस्ती येथे शनिवारी (दि.6) रात्री पावणे दहा वाजता झाली.

या प्रकरणी दोन अज्ञाता विरोधात चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 40 वर्षीय महिलेने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Marriage App Crime : शादी डॉट कॉमवर ओळख, लग्नाच्या आमिषाने बलात्कार अन् आर्थिक फसवणूक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या जेवणानंतर घराजवळ शतपावली करत होत्या. यावेळी दोन अज्ञात दुचाकीवरून आले व त्यांनी फिर्यादीच्या गळ्यातील 50 हजार रुपयांचे मंगळसूत्र हिसकावून दुचाकीवरून पळून गेले. यावरून चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.