Chikhali : व्यावसायासाठी माहेराहून पैसे आणण्याची मागणी करित विवाहितेचाछळ ; सासरच्या पाच जणांविरोधात गुन्हा

Marital harassment demanding money from father for business; Crime against five of the father-in-law : पती, सासू , सासरे व नणंद हे सर्व जण फिर्यादी यांना वारंवार टोचून बोलायचे

एमपीसी न्यूज – पतीला व्यावसायासाठी लागणारा पैसा माहेरून आणण्याचा तगादा लावून वारंवार शिवीगाळ, मारहाण करुन विवाहितेचा मानसिक व शारिरीक छळ करणाऱ्या सासरच्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पती संतोष जाधव (वय. 32), सासू पद्माबाई रामकिसन जाधव, सासरे रामकिसन जाधव, नणंद मनिषा रमेश गायकवाड, नंदावा रमेश गायकवाड ( रा. भांगरे काॅलनी, चिखली) यांच्या विरोधात गुरुवारी (दि.9) चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी पीडित 26 वर्षीय विवाहित महिलेने चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या पतीला व्यवसायासाठी पैशाची गरज होती.  या व्यवसायासाठी लागणारा पैसा माहेरून वडिलांकडून आणावा, यासाठी घरातील पती, सासू , सासरे व नणंद हे सर्व जण फिर्यादी यांना वारंवार टोचून बोलायचे.

तसेच, शिवीगाळ करत भांडण करून मारहाण करित त्यांचा मानसिक व शारिरीक छळ केला.

चिखली पोलिस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.