Chikhali : गुंगीचे औषध देऊन महिलेवर बलात्कार; दोघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – चुकांची माफी मागण्यासाठी महिलेला लॉजवर नेऊन तिला गुंगीचे औषध दिले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. याचे मोबाइलमध्ये अश्लील व्हिडिओ काढले. त्यानंतर या व्हिडीओच्या आधारे आरोपीने महिलेवर वारंवार बलात्कार केला. याबाबत दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रवींद्र लसणे (वय 30, रा. उलवेगाव, नवी मुंबई), दीपक पाटील (रा. मोरेवस्ती चिखली) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. या प्रकरणी 30 वर्षीय महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीकडून महिलेबाबत झालेल्या चुकांची माफी मागण्यासाठी त्याने महिलेला लॉजवर बोलावले. महिला लॉजवर आल्यानंतर तिला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला. याचे आरोपीने मोबाइलमध्ये अश्लील व्हिडिओ काढले हा प्रकार 2010 साली झाला. त्यानंतर ऑगस्ट 2018 मध्ये आरोपीने पीडित महिलेचा नाव पत्ता शोधून पुन्हा शरीरसंबंध ठेवण्याची मागणी केली. यासाठी महिलेने नकार दिला असता आरोपीने यापूर्वी काढलेले अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर आणि नातेवाईकांमध्ये व्हायरल करण्याची धमकी दिली.

बदनामीची धमकी देत आरोपीने त्याच्या कारमधून महिलेला नेऊन तिच्यावर पुन्हा बलात्कार केला. तसेच पीडित महिला काम करत असलेल्या हॉस्पिटलमध्ये वेळोवेळी जाऊन दीपक पाटील याने महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. याबाबत पिडीत महिलेने चिखली पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा नोंदवला. चिखली पोलिस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.