Chikhali : वाट अडवून तरुणीचा विनयभंग; घरच्यांना जीवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज – क्लासला जाताना तरुणीची वाट अडवून तिचा विनयभंग केला. तसेच तिच्या घरी जाऊन घरच्यांना जीवे मारण्याची धमकी दिली ही घटना मागील पाच महिन्यांपासून स्पाईन रोड चिंचवड आणि घरकुल चिखली येथे घडली.

_MPC_DIR_MPU_II

याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सद्दाम जब्बार शेख (रा. हरगुडे वस्ती, चिखली)  याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अकाउंट क्लासला जाते. त्यावेळी आरोपी फिर्यादीला चेरीज स्वीट होम, स्पाईन रोड येथे अडवून तिचा हात पकडत ‘तू मला आवडतेस, मी तुझ्याशीच लग्न करणार आहे.’ असे म्हणून वारंवार त्रास देत असे. तसेच ‘तू लग्नाला होकार दिला नाही तर तुझे आई वडिलांना भावाला जीवे मारीन.’ अशी धमकी दिली. यावरून तरुणीने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. चिखली पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून पोलीस उपनिरीक्षक बागुल तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.