Chikhali Murder : मित्रानेच केला घात, वीस वर्षीय तरुणाची गोळ्या घालून हत्या

एमपीसी न्यूज – भर दुपारी मित्रानेच मित्राची गोळ्या झाडून (Chikhali Murder) हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार चिखली येथे घडला. एका मित्राने त्याच्या साथीदारासोबत मिळून मित्राला गोळ्या घालून ठार मारले आहे. ही घटना आज (दि. 22) दुपारी पावणे दोन वाजताच्या सुमारास घडली.

कृष्णा उर्फ सोन्या हरिभाऊ तापकीर (वय 20, रा. चिखली गाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ उर्फ सोन्या पानसरे (रा. मोई), सिद्धार्थ कांबळे या दोघांनी कृष्णा उर्फ सोन्या तापकीर याच्यावर सोमवारी दुपारी गोळ्या झाडल्या.

Hadapsar : आजाराला कंटाळून कुटुंबाचा आत्महत्येचा प्रयत्न; वडिलांचा मृत्यू

यामध्ये गंभीर जखमी झालेल्या कृष्णा याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता (Chikhali Murder) त्याचा उपचारादरम्यानच  मृत्यू झाला. सौरभ पानसरे आणि कृष्णा तापकीर हे मित्र आहेत.

गोळ्या झाडून ठार मारण्याचे कारण अद्याप समजू शकले नसून आरोपींना पकडण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.