Chikhali Murder : चिखली येथे मित्रांच्या वादात तरुणाचा खून

एमपीसी न्यूज – चिखली येथील बैलगाडा मैदानावर मित्रांच्या वादात आज (शुक्रवार) रात्री आठच्या सुमारास एका तरुणाचा खून (Chikhali Murder) करण्यात आला.

सूरज उर्फ सोन्या संदीप शिंदे (वय 22, रा. यशवंतनगर, पिंपरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांनी ही माहिती दिली.

सूरज व त्याचे तीन मित्र आज रात्री चिखली येथील बैलगाडा मैदानावर गेले होते. त्यांच्यामधील वादामुळे  सूरजवर हल्ला करण्यात आल्याचा पोलीसांना संशय आहे.

Pune News : पुणे- मुंबई महामार्गावर ट्रकचा अपघात, अपघातात ट्रक चालकाचा मृत्यू

लोखंडी पट्टीने व धारदार शास्त्राने त्याच्या डोक्यावर व शरीरावर वार (Chikhali Murder) करण्यात आले होते. हल्ल्यानंतर त्याचे मित्र पळून गेले. या हल्ल्याची माहिती एका नागरिकाने जवळच पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांना रात्री 8.30 ते 8.45 वा चे दरम्यान दिली. त्यामुळे लगेच पोलीस घटनास्थळी पोहोचले.
पोलिसांनी जखमी शिंदेला उपचारासाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात नेले. पण उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी व अंमलदार तसेच डीबी टिम घटनास्थळावर असून तपास चालू आहे.
खुनाचे (Chikhali Murder) नेमके कारण अजून कळाले नाही. पोलीस त्या तरुणाच्या मित्रांचा शोध घेत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.