Chikhali : पूर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगारावर खुनी हल्ला

Murderous attack on a criminal in Sarai out of prejudice

एमपीसी न्यूज – जुन्या भांडणाच्या कारणावरून एका सराईत गुन्हेगारावर कोयत्याने सपासप वार करुन खुनी हल्ला केल्याची घटना चिखलीमधील घरकुल वसाहत येथे शुक्रवारी (दि. 29) घडली.

अनिकेत रणदिवे (वय 18, रा. चिखली) असे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी अनिकेत याचे चिखली येथील काही तरुणांसोबत वाद सुरू होते. भाईगिरी आणि वर्चस्वावरून त्यांच्यात भांडणे होत होती. शुक्रवारी तीन जणांनी अनिकेत याच्यावर कोयता, चॉपर आणि सिमेंटच्या गट्टूने मारून खूनी हल्ला केला.

यात अनिकेत गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like