Chikhali: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून साने कुटुंबीयांचे सांत्वन

Chikhali: NCP President Sharad Pawar offers condolences to Sane family चिखली ग्रामस्थांनी आदित्य बिर्ला हॉस्पिटलची चौकशी करण्याची मागणी शरद पवार यांच्याकडे केली आहे.

एमपीसी न्यूज- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे दिवंगत नगरसेवक दत्ता साने यांच्या निवासस्थानी कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्यांनी कुटुंबीयांशी संवाद साधला. दरम्यान, चिखली ग्रामस्थांनी आदित्य बिर्ला हॉस्पिटलची चौकशी करण्याची मागणी शरद पवार यांच्याकडे केली आहे.

साने कुटुंबातील सदस्य, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी महापौर मंगला कदम, योगेश बहल उपस्थित होते. कोरोनामुळे माजी विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने यांचे शनिवारी (दि.4) बिर्ला हॉस्पीटलमध्ये निधन झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like