Chikhali: साने कुटुंबियांच्या पाठीशी राष्ट्रवादी खंबीरपणे उभी – पार्थ पवार

NCP stands firmly behind Sane's family - Partha Pawar : साने कुटुंबियांचे सांत्वन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादीचे दिवंगत नगरसेवक दत्ता साने यांच्या कुटुंबियांची राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांनी आज (सोमवारी) सांत्वनपर भेट घेतली. साने यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी राष्ट्रवादी परिवार कायम खंबीरपणे उभा असेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक दत्ता साने यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर चिंचवड परिसरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र दुर्दैवाने उपचारा दरम्यान 4 जुलै रोजी त्यांचा मृत्यू झाला होता.

साने यांच्या आकस्मिक निधनामुळे शहराबरोबरच राष्ट्रवादी पक्षाचा खंदा शिलेदार गमावल्याच दुःख व्यक्त करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आमदार रोहित पवार यांनी साने परिवाराची भेट घेऊन त्यांच्या दुःखात आपण सहभागी असल्याच सांगितले.

त्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार यांनीही साने यांच्या परिवाराची भेट घेत कुटुंबियांचे सांत्वन केले. साने यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी राष्ट्रवादी परिवार कायम खंबीरपणे उभा असेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

दरम्यान, साने यांच्यावर ज्या खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. तिथे त्यांच्यावर योग्य पद्धतीने उपचार केल्या गेले नसल्याचा आरोप करत रुग्णलय प्रशासनाची चौकशी करणयाची मागणी साने यांच्या कुटुंबीयांनी पार्थ पवार यांच्याकडेही केली आहे.

या मागणी बाबत नक्कीच संबंधितांकडे पाठपुरावा करणार असल्याच आश्वासन पार्थ यांनी दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like