Chikhli : वीज जो़डणी न झाल्याने महावितरणने झालेले नुकसान भरपाई देण्याची मागणी 

एमपीसी न्यूज – एक वर्षभर वीज जोडणी न मिळाल्याने 20 लाख रुपये ही झालेली नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी  चिखली येथील मे. इश्वरी इंटरप्रायजेसने महावितरणच्या अधिक्षकांकडे लेखीनिवेदनांद्वारे केली आहे. 

दिलेल्या निवेदनांत त्यांनी म्हटले आहे की, 2017मध्ये  वीज वितरण कनेक्शन मिळावे याकरिता अर्ज केला होता. पण वर्षभर ही वीज जोडणी मिळाली नाही.  उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या जमिनीचा वापर होऊ शकला नाही. त्या जमिनीची बाजारभावाने  किंमत लक्षात घेतली तर वीस लाखाचे नुकसान झाले. जमिनीचा वापर व्हावा म्हणून कर्ज काढून शेड उभारणी केली होती पण त्यात मी फसलो. वरीष्ठ कार्यालयापर्यंत वीज कनेक्शन द्या अशी मागणी वारंवार केली. पण त्याकडे महावितरणचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहे. या प्रकरणांत ज्या कुणी अधिका-यांचा दोष आहे. त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.