अल्पवयीन पीडित मुलीने चिखली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून साहिल निसर्गंध (रा. चिखली) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी अल्पवयीन मुलीला समाज मंदीरात भेटण्यासाठी बोलवले. तिथे बांधकाम साईटवर जबरदस्तीने तिच्यावर लैंगिक आत्याचार केला. घरी सांगितल्यास तुला बघुन घेतो अशी धमकी दिली. पीडित मुलगी दोन महिन्यांची गर्भवती राहिली. चिखली पोलीस अधिक तपास करीत आहेत.