Chikhali News: सशस्त्र दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपीला खंडणी दरोडा विरोधी पथकाकडून अटक

चिखली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या सशस्त्र दरोड्याच्या गुन्ह्यातील फरारी आरोपी लक्ष्मण गायकवाड चिखली येथील तोरणा हॉटेलच्या मागे असलेल्या खाणीजवळ येणार आहे.

एमपीसी न्यूज – सशस्त्र दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी दरोडा विरोधी पथकाने अटक केली आहे.

लक्ष्मण बसवराज गाडेकर (वय 22, रा. तळवडे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या खंडणी दरोडा-विरोधी पथकाचे पोलीस चिखली परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस नाईक निशांत काळे आणि पोलीस शिपाई सुधीर डोळस यांना माहिती मिळाली की, चिखली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या सशस्त्र दरोड्याच्या गुन्ह्यातील फरारी आरोपी लक्ष्मण गायकवाड चिखली येथील तोरणा हॉटेलच्या मागे असलेल्या खाणीजवळ येणार आहे.

त्यानुसार पोलिसांनी खाणीच्या परिसरात सापळा लावला. सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास आरोपी लक्ष्मण खाणीजवळ येऊन कुणाचीतरी वाट पाहताना दिसला. पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने चिखली परिसरात एक सशस्त्र दरोड्याचा गुन्हा केल्याचे कबूल केले.

त्यावरून पोलिसांनी आरोपी लक्ष्मण याला अटक केली आहे. त्याला पुढील कारवाईसाठी चिखली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.