Chikhali News: चिखली, जाधववाडीतील अतिक्रमणावर कारवाई

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने अतिक्रमणावर धडक कारवाई सुरु केली आहे. चिखली, जाधववाडीतील अतिक्रमणावर आज सकाळपासून कारवाई केली जात आहे.

_MPC_DIR_MPU_II

चिखली वडाचा मळा (सिल्व्हर जिम समोरील भाग ) पत्रा शेड वर आज कारवाई केली जात आहे. या कारवाई मध्ये एकूण 1,50,000 स्क्वेअर फूट बांधकाम निष्कासन करावयाची कारवाई चालू आहे. काही नागरिक स्वत:हून अतिक्रमण काढून घेत आहेत.

2 पोकलेन , 7 जेसीबी , 2 क्रेन , 105 पोलीस, 10 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 3 पोलीस निरीक्षक, 1 सहाय्यक पोलिस उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त अजित पवार, उपायुक्त मनोज लोणकर, 3 कार्यकारी अभियंता, 5 उपअभियंता, 10 कनिष्ठ अभियंता, 25 बीट निरीक्षक 100 मजूर असा फौजफाटा आहे. दरम्यान, लॉकडाऊननंतर महापालिकेने अतिक्रमणांवर धडक कारवाई सुरु केली आहे. लॉकडाऊननंतरची आजची मोठी कारवाई आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.