Chikhali News: घरकुलमधील वीज मीटर, वाढीव बिलाच्या तक्रारींचे निराकरण करा – अजय पाताडे

एमपीसी न्यूज – घरकुल वसाहतीतील नागरिकांच्या लाईट मीटर, बिलाबाबत असंख्य तक्रारी आहेत. अनेकांचे मीटर नादुरुस्त दाखवत आहे. नागरिकांनी तक्रार करुनही गेल्या दोन वर्षांपासून मीटर बदलले जात नाहीत. वीज मीटर, वाढीव बिलाच्या तक्रारींचे येत्या आठ दिवसात निराकरण करावे. अन्यथा महावितरण कार्यालयावर आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजपचे उपाध्यक्ष अजय पाताडे यांनी दिला.

याबाबत महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांना दिलेल्या निवेदनात पाताडे यांनी म्हटले आहे की, घरकुलमधील नागरिकांना भरमसाठ वीज बील येत आहे. त्याची जबरदस्तीने वसुली केली जात आहे. तक्रार करण्यासाठी घरकुलपासून सहा किलोमीटर असलेल्या मोशी येथे जावे लागते. तेथून थरमॅक्स चौकातील कार्यालयात पाठविले जाते. यात नागरिकांचा वेळ, पैसा वाया जाता आणि मनस्तापही सहन करावा लागतो.

कोरोनामुळे मुलांचे ऑनलाईन शिक्षण सुरु आहे. आयटीमधील काही मुलांचे घरुनच काम चालू आहे. त्यामुळे नाईलाजास्तव वाढीव बील आहेत. आर्थिक विवंचनेने त्रस्त असलेल्या नागरिकांना भरमसाठ वीज बिलामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आठ दिवसांमध्ये घरकुलमध्ये उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या जाणून घ्याव्यात. अन्यथा महावितरण कार्यालयावर आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.  निवेदनावर भाजप शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे, माजी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांची स्वाक्षरी आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.