Chikhali News : महाराष्ट्र वितरक सेनेच्यावतीने अन्नदिन साजरा

एमपीसीन्यूज : शिवसेना प्रणित महाराष्ट्र वितरक सेनेच्यावतीने चिखली परिसरात जागतिक अन्नदिन साजरा करण्यात आला. या वेळी गरीब नागरिक व मुलांना मोफत आन्नदान करण्यात आले.

महाराष्ट्र वितरक सेना जिल्हा सरचिटणीस वैभव छाजेड यांनी या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला. वैभव छाजेड यांच्यासह शिवसेना उपविभाग प्रमुख संजय गाढवे, तसेच वैभव थोरात यांच्या हस्ते अन्नदान करण्यात आले. स्पाइन रोड झोपडपट्टी, आकुर्डी खंडोबा माळ सिग्नल तसेच निगडी सिग्नल येथे एकूण १४० नागरिकांना अन्नदान करण्यात आले.

या उपक्रमांतर्गत गोरगरीब नागरिकांना मोफत अन्न मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. कुणीही उपाशी राहू नये म्हणून मोफत अन्नदानाचा उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती वैभव छाजेड यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.