Chikhali News : मोरेवस्ती भागात पावसाळी पावसाळी वाहिन्या टाका : नेताजी काशीद

एमपीसीन्यूज न्यूज : चिखली -मोरेवस्ती भागातील मनीषा हौसिंग सोसायटीसह अन्य सोसयट्यामध्ये दरवर्षी मुसळधार पावसात पावसाचे वाहून येणारे पाणी नागरिकांच्या घरांमध्ये शिरते. त्यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडते. या वर्षी ही समस्या उद्भवू नये, यासाठी या भागात  तातडीनेपावसाळी वाहिन्या टाकाण्याची मागणी शिवसेना उपशहरप्रमुख नेताजी काशीद यांनी केली आहे.

या संदर्भात काशीद यांनी महापालिकेच्या फ प्रभाग स्थापत्य अभियंत्यांना निवदेन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, दरवर्षी जोरदार पावसानंतर चिखली -मोरेवस्ती भागातील मनीषा हौसिंग सोसायटीतील अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरते. या भागात पावसाळी वाहिन्यांची व्यवस्था नसल्याचे त्याचा नागरिकांना फटका बसतो.

घरात पाणी शिरल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होतात. काही जुन्या घरांमध्ये तर गुढघाभर पाणी शिरते. त्यामुळे नागरिकांना रात्र जागून काढण्याची वेळ येते. अनेकांना रात्रभर घरात घुसलेले पाणी उपसावे लागते. वयोवृद्ध आणि लहान मुलांचे खूप हाल होतात. शिवाय पाणी साचून राह्ल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढतो. त्याचाही त्रास नागरिकांना सहन करावा लागतो.

अंगणवाडी येथील पाण्याचा मोठा प्रवाह वाहत येतो. पावसाळी वाहिन्यांची व्यवस्था केल्यास हा प्रवाह वाहिन्यांमधून पुढे जाऊ शकतो. त्यामुळे पाणी तुंबणे किंवा नागरिकांच्या घरात पाणी शिरणे या समस्या उद्भवणार नाहीत. त्यासाठी  स्वतः लक्ष घालून मोरेवस्ती येथील मनीषा सोसायटी आणि अन्य सोसायट्यांमधील तातडीने पावसाळी वाहिन्या टाकून नागरिकांना होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी काशीद यांनी निवेदनात केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.