Chikhali News : ‘घरकुलमधील ड्रेनेज वाहिन्या पावसाळ्यापूर्वी साफ करा’

एमपीसी न्यूज – चिखली घरकुल वसाहतीमधील सखल भागामधील सोसायट्यांच्या तळमजल्यावर पाणी साचते. तसेच अनेक ठिकाणी माती व राडारोडा साचला आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी ड्रेनेज वाहिन्या साफ कराव्यात. राडारोडा उचलण्यात यावा, अशी मागणी भाजपचे शहर उपाध्यक्ष अजय पाताडे यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात पाताडे यांनी म्हटले आहे की, चिखली येथील घरकुल वसाहत थोड्या सखल भागांमध्ये असल्याने पावसाळ्यात सोसाट्यांच्या तळमजल्यावर पाणी साचते.

सोसायटी परिसरामध्ये माती व राडारोडा साचला आहे. तो त्वरित उचलण्यात यावा. पावसाळ्यात पाणी तुबुंन पार्किंगमध्ये साचून राहते. यामुळे डासांचे प्रमाण वाढून परिसरामध्ये साथीचे आजार उद्भवतात. सध्या कोरोनाच्या काळामध्ये रोगराई वाढू नये यासाठी खबरदारी घेणे गरजेचे आहे.

लॉकडाउनमुळे नागरिकांचे हाल झाले आहेत. त्यात आरोग्याच्या समस्या उद्भवू नयेत. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी घरकुल परिसर स्वच्छ करावा. पाण्याच्या निचरा व्यवस्थित होईल. अशा पद्धतीने सर्व वाहिन्य साफ कराव्यात आणि परिसर स्वच्छ ठेवावा, अशी मागणी पाताडे यांनी केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.