Chikhali News : प्रभाग एक मधील अर्धवट कामे लवकरात लवकर पूर्ण करा – शिवसेना

एमपीसी न्यूज – साने चौक ते चिखली रास्ता तसेच मोरेवस्तीच्या अंतर्गत सोसायटीमधील रस्त्याची कामे अर्धवट ठेवण्यात आली आहेत. यामुळे नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. प्रभाग एक मधील अर्धवट कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

_MPC_DIR_MPU_II

याबाबत शिवसेना पुणे जिल्हा समन्वयक राहुल भोसले व विभाग प्रमुख सतीश डिसले यांच्यावतीने पालिकेचे स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता विजयकुमार काळे आणि उपअभियंता हनुमंत शिंदे यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी संजय गाढवे, दादाराव ठाकरे, आनंद हिंगे, अशोक गायकवाड, विजय शिवपुजे, हरिभाऊ लोहकरे, घनश्याम सूर्यवंशी, अनंत मते, सागर पाचारणे व पदाधिकारी उपस्थित होते.

साने चौक ते चिखली रास्ता तसेच मोरेवस्तीच्या अंतर्गत सोसायटीमधील जी कामे करण्यात आली आहेत ती अर्धवट अवस्थेत ठेवण्यात आली आहेत. यामुळे नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. रस्त्यात करण्यात आलेले खोदकाम, रस्त्यावरील खडी व वाळू यामुळे अपघातांना निमंत्रण दिले जात आहे. त्यामुळे लवकरात लवकर हि कामे पूर्ण करवीत अन्यथा शिवसेनेच्या वतीने जन आंदोलन करण्यात येईल आसा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like