Chikhali News: चिखलीत कोरोना लसीकरण केंद्र सुरु

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या फ प्रभागाचे अध्यक्ष कुंदन गायकवाड यांच्या पाठपुराव्याने चिखली येथे कोरोना लसीकरण केंद्र सुरु झाले आहे. नागरिकांनी कोरोनाचे लसीकरण करुन घेण्याचे आवाहन केले आहे.

चिखलीतील शाळा क्रमांक 90 येथे मोफत लसीकरण केंद्र सुरु झाले आहे. प्रभाग अध्यक्ष कुंदन गायकवाड, प्रभाग अधिकारी सीताराम बहुरे, नगरसेविका साधना मळेकर, स्वीकृत सदस्य संतोष मोरे, दिनेश यादव, महापालिकेच्या ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीता साळवे, संदीप शेलार, अंकुश मळेकर, तुषार हजारे उपस्थित होते.

आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना लसीकरण केंद्र सुरु झाले आहे. कोरोनाची लस पूर्णपणे सुरक्षित आहे. 45 ते 59 वयोगटातील व्याधीग्रस्त व्यक्ती (को-मॉर्बिड) आणि 60 वर्षापुढील ज्येष्ठ नागरिकांनी लसीकरणासाठी नावनोंदणी करावी. लसी टोचवून घ्यावी, असे आवाहन प्रभाग अध्यक्ष गायकवाड यांनी नागरिकांना केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.