Chikhali News : विवाह सोहळ्यात नवदाम्पत्याला ‘गो दान’

एमपीसी न्यूज – विवाह सोहळ्यात महागड्या भेटवस्तू, पैसे आणि इतर साहित्य भेट म्हणून दिल्या जातात. पण, भारतीय संस्कृतीचा वारसा जपत वाकड येथे बर्ड व्हॅली येथे झालेल्या विवाह सोहळ्यात नवदाम्पत्याला ‘गो दान’ करण्यात आले.

चंद्रभागा गोशाळेच्या वतीने गोरक्षक ॲड. चिरंजीव मंगेश नढे व शिवानी या नव विवाहित दांपत्याला कामधेनू कपिला गाय दान करण्यात आली. अखिल भारत कृषी गोसेवा संघाचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे, मानद पशुकल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांच्या हस्ते हे गो दान करण्यात आले.

यावेळी नगरसेवक दिनेश यादव, संदीप वाघिरे, विठ्ठल काटे, चंद्रभागा गोशाळेचे संचालक रामकृष्ण लांडगे, धनंजय गावडे, निलेश चास्कर, अभिजित शिंदे, निलेश देशमुख व विविध क्षेत्रातील उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.