Chikhali News : दादाराव काशीद यांचे निधन

एमपीसीन्यूज : शिवसेना पिंपरी चिंचवड उपशहरप्रमुख नेताजी काशीद यांचे वडील दादाराव भानुदास काशीद यांचे मंगळवारी ( दि.22 ) सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 95 वर्षांचे होते.

तुळजापूर तालुक्यातील केमवाडी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

काशीद कुटुंबावर दुःखाचा डोंगर

दरम्यान,  नेताजी काशीद यांच्या मातोश्री आणि भावाचे दोन महिन्यापूर्वी निधन झाले होते. त्यानंतर आता त्यांच्या वडिलांचेही निधन झाल्याने काशीद कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एकाच कुटुंबातील तीन सदस्यांनी अवघ्या दोन  महिन्यांच्या कालावधीत जगाचा निरोप घेतल्याने केमवाडीसह तुळजापूर तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.