chikhali News : राजे प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांमुळे टळली गणेश मूर्तींची विटंबना, पाण्याबाहेर आलेल्या 400 मूर्तींचे पुन्हा विसर्जन

गणेशोत्सव काळात चिखली परिसरातील नागरिकांनी इंद्रायणी नदीमध्ये गणेश मूर्तींचे विसर्जन केले होते. त्याचबरोबर निर्माल्यही नदीपात्रात टाकले होते.

एमपीसीन्यूज : इंद्रायणी नदीपात्रात विसर्जित केलेल्या असंख्य गणेश मूर्ती पाणीपातळी घटल्याने पात्रात तरंगताना आढळून आल्या, तर काही मूर्ती पात्रालगत अडकलेल्या अवस्थेत दिसू लागतच चिखलीतील राजे प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी तातडीने या गणेश मूर्तींचे विधिवत पुन्हा विसर्जन केले.

गणेशोत्सव काळात चिखली परिसरातील नागरिकांनी इंद्रायणी नदीमध्ये गणेश मूर्तींचे विसर्जन केले होते. त्याचबरोबर निर्माल्यही नदीपात्रात टाकले होते.

सध्या नदीपात्रातील पाण्याची पातळी कमी झाल्याने विसर्जित केलेल्या गणेश मूर्ती गाळात अडकलेल्या अवस्थेत दिसत होत्या. निर्माल्याचा थरही किनाऱ्यालगत साचला होता.

आळंदीतील भाविक तीर्थ म्हणून वापर करतात.  नदीचे प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने आणि गणेश मूर्तींची विटंबना होऊ नये म्हणून राजे प्रतिष्ठानच्या जागरुक कार्यकर्त्यांनी नदी पात्रात उतरुन पाण्याबाहेर आलेल्या आणि चिखलात रुतलेल्या सुमारे 400 मूर्ती खोल पाण्यात पुन्हा विधीवत विसर्जित केल्या.

प्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी बालघरे, सागर मोरे, चंद्रकांत सपाटे, आकाश डिंबर, सागर बिराजदार, सनी वायदंडे, दीपक बालघरे, सागर शेंडगे, पवन डिंबर, सावकाश गिरी , प्रकाश थोरात , पप्पू पवळ, महेश बालघरे, गोविंद बालघरे, ऋषी भोंडवे, सुनील चव्हाण, प्रकाश गिरी आणि बाल कार्यकर्ता ज्ञानराज बालघरे यांनी सहभाग घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.