Chikhali News: डेंग्यू डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे नष्ट करा, महापालिकेचे आवाहन

एमपीसी न्यूज – डेंग्यू डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे नष्ट करून नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या वतीने करण्यात आले. ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने जाधववाडी चिखली परिसरात आज (मंगळवारी) जनजागृती रॅली काढून प्रबोधन केले.

नगरसेवक राहूल जाधव, नगरसेविका अश्विनी जाधव,सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, जेष्ठ वैद्यकिय अधिकारी डॉ. सुनीता साळवे, सहाय्यक आरोग्य अधिकारी गणेश देशपांडे, विजय दवाळे, सुनील माने, वैभव कांचनगौडार, राजेंद्र उज्जैनवाल आदी उपस्थित होते.

बोल्हाई मळा जाधवाडी चिखली या ठिकाणी कंटेनर सर्वेक्षण मोहिम राबविण्यात आली. घरोघरी कंटेनर सर्वेक्षण करताना घरांमधील पाण्याची टाकी, फ्रिज, कुलर, कुंड्या आदी गोष्टींची तपासणी केली. याबाबत डेंग्यु/ मलेरीया डासांच्या विषयी नागरिकांमध्ये जनजागृती करून त्याबाबत डेंग्यु/ मलेरीयाचे माहिती पत्रक वाटण्यात आले.

प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून घरातील पाण्याची टाकी, फ्रिज, कुलर, कुंड्या इत्यादी गोष्टीं आठ दिवसांतून एकदा रिकामे करून कोरडे करून स्वच्छ ठेवावे. याबाबत अवाहन करणेत आले आहे. या जनजागृतीपर रॅलीला नागरीकांनी चांगला प्रतिसाद दिला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.