Chikhali News: संतपीठामध्ये भक्तिरस कार्यक्रम उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका संचलित जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ स्कुल अँड  ज्युनिअर कॉलेज टाळगाव चिखली येथे कार्तिकी एकादशीचे औचित्य साधून महापालिका संगीत अकादमीच्या संयुक्त विद्यमाने भक्तिरस कार्यक्रम उत्साहात पार पडला. अभंग, गौळणी सादर केल्या.

महापौर उषा ढोरे, आयुक्त राजेश पाटील, जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज पुंडलिक महाराज देहुकर, विशाल महाराज मोरे, महादेव महाराज बोराड शास्त्री, दिंडीचे अध्यक्ष काळुराम मोरे, राजु महाराज ढोरे, स्वाती मुळे, प्राचार्य ज्ञानेश्वर गाडगे उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संतपीठाच्या उभारणीमध्ये संत महंतांनी कायमस्वरुपी मार्गदर्शन करावे. पालकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद असावा असे आयुक्त पाटील म्हणाले. सीबीएससी शिक्षणाबरोबर मराठी, साहित्य व संस्कृतीचे एक अगळेवेगळे शिक्षण देण्यासाठी संतपीठाची निमिर्ती चिखलीत होत असल्याचे महापौर उषा ढोरे यांनी सांगितले.

संतपीठाचे संचालक राजू महाराज मोरे यांनी श्रीरामाचा 13 अक्षरी मंत्र, रुप पाहता लोचणी या अभंगरचनाने सुरुवात केली. गायत्री थोरबोले यांनी सुंदर ते ध्यान, विठ्ठल रखुमाई हे अभंग सादर केले. स्नेहल पगार यांनी ओव्या गाऊनी सुरात हे गीत सादर केले. नेहा नाफडे यांनी कानडा राजा पंढीराचा व आळंदी हे गाव हे अभंग सादर केले. वैजयंती भालेराव यांनी खेळ मांडीयेला वाळवंटी घाई व दिंडी चालली हे अभंद सादर केले. स्मिता देशमुख यांनी सर्व सुखची लहरी हा अभंग सादर केला. नंदीन सरीन यांनी ओम नमो ज्ञानेश्वरा व सावळे मनोहर रुप अति देखणे हे अभंग सादर केले. सुषमा शिंदे यांनी आनंदाचे डोही आनंद तरंग व अरे अरे ज्ञाना झालासी पावन हे अभंग सादर केले. गायत्री थोरबोले यांनी एकच टाळी झाली हा अभंग आणि गीरीधर का रुसला ही गौळण सादर केली. राजु महाराज ढोरे यांनी अकल्प आयुष्य तया गा अभंग व गड्यानो राधा की रे झाला ही गौळण सादर केली. दलाल सर यांनी रंग आणा हो रंगनी व मिळे आवडीचे सुख हे अभंग सादर केले. तबला साथ विनोद सुतार, संतोष दळवी, समीर सुर्यवंशी, मृदंग साथ तुकाराम ढोरे, करताल साथ हरिभाऊ असदकर, हार्मोनियाची साथ दलाल सर, उमेश पुरोहित, नेहा नाफडे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.