chikhali News : चिखली-कुदळवाडीत मास्क आणि कापडी पिशव्यांचे वाटप

एमपीसीन्यूज : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चिखली कुदळवाडी येथील श्री विठ्ठल मंदिर चौकात स्थानिक नागरिकांना कापडी पिशवी आणि मास्कचे वाटप कार्यक्रम करण्यात आले.

भारतीय जनता पार्टी कुदळवाडी चिखली व आमदार श्री पै. महेशदादा लांडगे युवा मंच कुदळवाडी यांच्यावतीने हा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी स्विकृत सदस्य दिनेश यादव यांच्यासह काळुराम यादव, दत्तात्रय मोरे, युवराज पवार, उत्तम बालघरे, नितीन मोरे, विजयराज यादव, काका शेळके, पांडुरंग बालघरे, किसन यादव, केरू बालघरे, रामलाल देवासी, कुंदन गुप्ता, सद्दाम खान, रामेश्वर पाचारे, शशिकांत पुंड, कमलाकर बालघरे, बालाजी पांचाळ, अतुल सोनकांबळे, रणजीत वायकर, मनोज मोरे, बाळासाहेब हरगुडे, कोडिंबा यादव आदी उपस्थित होते.

सध्या पिंपरी चिंचवड शहर परिसरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून स्थानिक नागरिकांना मोफत मास्क आणि कापडी पिशव्यांचे वाटप केले.

प्रत्येक नागरिकाने घराबाहेर पडताना मास्क वापरावा. स्वतःसह इतरांच्याही आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांनी यावेळी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.