Chikhali News : चिखली स्मशानभूमीत विद्युत व गॅस दाहिनी उभारा : यश साने

एमपीसीन्यूज : वाढती लोकसंख्या आणि कोरोनामुळे निगडी येथील स्मशानभूमीवर येणार ताण लक्षात घेता चिखली गावातील समशानभूमीतील गॅस व विद्युत दाहिनीचे काम तातडीने मार्गी लागण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष यश साने यांनी केली आहे.

या संदर्भात साने यांनी महापालिका आयुक्तांना निवदेन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, महापालिका प्रभाग क्र. 1, 2, 11, 12 मधील लोकसंख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत चिखली गावातील स्मशानभूमीवरील ताण वाढला आहे. तसेच प्रभागांसाठी निगडी येथे अमरधाम समशानभूमीत एकच विद्युत दाहिनी कार्यरत आहे.

या समशानभूमीत निगडी, यमुनानगर, मोरेवस्ती, आकुर्डी, तळवडे, कृष्णानगर, संभाजीनगर, प्राधिकरण, कुदळवाडी, जाधववाडी या परिसरातील मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात येतात.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आणि त्यामुळे होणाऱ्या वाढत्या मृत्यूंमुळे निगडीतील अमरधाम स्मशानभूमीवर प्रचंड ताण येत आहे. त्यामुळे चिखली परिसरासाठी चिखली गावातील स्मशानभूमीत गॅस आणि विद्युत दाहिनीचे काम लवकरात लवकर करण्याची गरज आहे. त्यासाठी लागणारी योग्य जागाही उपलब्ध असल्याचे यश साने यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.