-MPC-TOP-MOST-BANNER-I

Chikhali News : बॅनर फाडले तरी समाजकार्य सुरूच ठेवणार : दिनेश यादव यांचा इशारा

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसीन्यूज : ‘ गेल्या काही वर्षांपासून चिखली-कुदळवाडीतील गोरगरिबांसाठी अहोरात्र सेवा करीत आहे. या पुढे ती करणारच आहे. कुणी लसीकरणाचे फ्लेक्स फाडले म्हणून घाबरून मी माझे सामाजिक कार्य बंद करणार नाही, हे ध्यान्यात ठेवा’, असा इशारा फ प्रभागाचे स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांनी दिला आहे.

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

फ प्रभागाचे स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांनी कुदळवाडी येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी लावलेला फ्लेक्स अज्ञात समाजकंटकांनी बुधवारी फाडला. त्यानंतर परिसरात एकच खळबड उडाली. शिवाय चिखली, कुदळवाडी आणि परिसरातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या.

या घटनेबाबत दिनेश यादव म्हणाले, फ्लेक्स फाडून माझे सामाजिक कार्य कुणी संपवू शकत नाही. अनेक वर्षांपासून चिखली-कुदळवाडीतील गोरगरिबांसाठी अहोरात्र सेवा करीत आहे, या पुढे ती करणारच आहे. मी उद्या पोलिसांत लेखी तक्रार देणार आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.