Chikhali News : कुदळवाडीत तीनशे नागरिकांची मोफत कोरोना चाचणी

एमपीसीन्यूज : आमदार श्री महेशदादा लांडगे व पिपंरी चिचंवड महानगरपालिका वैद्यकीय विभाग यांच्या सहकार्याने कुदळवाडी भागात आयोजित कोरोना चाचणी शिबिरात तीनशे नागरिकांची मोफत चाचणी करण्यात आली.

स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांच्या पुढाकारातून हे शिबीर आयोजित करण्यात आले. कुदळवाडी येथे श्री भैरवनाथ मंदिराजवळील महापालिका मराठी शाळेत हे शिबीर घेण्यात आले. दिवसभरात तीनशे नागरिकांची मोफत कोरोना चाचणी करण्यात आली. या वेळी सोशल डिस्टंसिंग पाळण्यात आले.

परिसरातील कामगारांनी आणि नागरिकांनी या शिबिरात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या नागरिकांचे चाचणी अहवाल लवकरच मिळणार आहेत.

कुदळवाडी परिसर कोरोना मुक्त करण्यासाठी स्वीकृत सदस्य दिनेश यादव प्रयत्नशील आहेत. यासाठी ते विविध उपक्रम राबवित असतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.