Chikhali News : ज्येष्ठांच्या लसीकरणासाठी भाजप युवा मोर्चाकडून मोफत वाहन व्यवस्था

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरात विविध ठिकाणी लसीकरण केंद्र उभारण्यात आली. प्रत्येक भागात 60 वर्षांवरील वरील ज्येष्ठ नागरिक व 45 ते 59 ह्या वयोगटातील इतर आजारांनी त्रस्त असलेल्या व्यक्तींचे लसीकरण केले जात आहे. भोसरी, चिखली, मोशी या भागातील लसीकरण केंद्रावर जाण्याची व येण्याची व्यवस्था तसेच लसीकरण नोंदणी प्रक्रिया आदी सुविधा भारतीय जनता युवा मोर्चा यांच्यावतीने मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे.

भारतीय जनता पक्षाच्यावतीने लसीकरणासाठी मार्गदर्शन केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. या केंद्रावर लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया तसेच केंद्रावर जाण्यासाठी आणि तेथून येण्यासाठी मोफत वाहन व्यवस्था उपलब्ध करण्यात आली आहे. या मार्गदर्शन केंद्रावर नोंदणीसाठी येणाऱ्या नागरिकांना येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सज्ज आहेत. त्यामुळे जेष्ठ नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली  भाजप युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस दिनेश यादव, जिल्हा उपाध्यक्ष शिवराज लांडगे, जिल्हा चिटणीस रवी जांभूळकर , भोसरी चऱ्होली मंडल अध्यक्ष उदय गायकवाड हे नागरिकांना लसीकरणासाठी मदत करत आहेत.

संकट काळात युवा मोर्चा नेहमी अग्रेसर राहिला आहे. तसेच आगामी काळातही नागरिकांना येणाऱ्या प्रत्येक अडचणी सोडविण्यासह जनसेवेकरिता नेहमी तत्पर राहू, अशी भावना स्वीकृत सदस्य व भाजप युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस दिनेश यादव यांनी व्यक्त केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.