Chikhali News : दिवाळीनिमित्त चिखली परिसरात ‘घर तिथे किल्ला उपक्रम’ – दिनेश यादव

एमपीसीन्यूज : आमदार श्री. पै. महेशदादा लांडगे युवा मंच व भारतीय जनता युवा मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळीनिमित्त किल्ले बनवा स्पर्धा 2020’चे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत ‘घर तिथे किल्ला उपक्रम’ राबविण्यात येणार असल्याची माहिती संयोजक व स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांनी दिली.

सध्याच्या स्मार्ट युगात हरवत चाललेली आपली संस्कृती, परंपरा जपण्यासाठी, लहान मुलामध्ये ऐतिहासिक वास्तू बद्दल आकर्षण निर्माण करण्यासाठी तसेच छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा महापराक्रमी इतिहासाचे स्मरण करण्यासाठी किल्ले बनवा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात येणार आहे.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नावनोंदणी करणे गरजेचे आहे. त्यासाठी काका शेळके (+919881245572) किंवा किशोर लोंढे (+918802013030), यांच्याशी संपर्क साधावा, असे आव्हान यादव यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.