Chikhali News : कुदळवाडीत ‘पदवीधर मतदार नोंदणी महाअभियान’

एमपीसीन्यूज : पिंपरी चिंचवड शहर भारतीय जनता युवा मोर्चा आणि आमदार महेशदादा लांडगे युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने चिखली कुदळवाडी परिसरात ‘पदवीधर मतदार नोंदणी महाअभियाना’चा प्रारंभ करण्यात आला आहे. या अभियानात जास्तीत जास्त युवा पदवीधारकांनी नाव नोंदविण्याचे आवाहन स्वीकृत सदस्य आणि ‘भाजयुमो’चे शहर सरचिटणीस दिनेश यादव यांनी केले आहे.

चिखली-कुदळवाडी येथील विठठ्ल मंदिराजवळील दिनेश यादव यांच्या जनसंपर्क कार्यालयात या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.

पदवीधर मतदार नोंदणीसाठी अर्जासोबत एक फोटो, आधारकार्डची झेरॉक्स, पदवी, पदविका प्रमाणपत्राची झेरॉक्स जमा करावी.

काही इच्छुक अर्जदारांना अद्याप पदवी प्रमाणपत्र मिळाले नसल्यास त्यांच्या पदवी वर्षाच्या मार्कशीटची झेरॉक्सही चालू शकेल. तसेच विवाहित महिलांसाठी विवाह नावनोंदणी प्रमाणपत्र अनिवार्य आहे.

पदवीधर मतदानाची संख्या वाढावी यासाठी पदवीधर मतदार वाढणे गरजेचे आहे. त्यासाठी मोठ्या संख्येने पदवीधरांनी मतदार नोंदणी करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन स्वीकृत सदस्य यादव यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.