Chikhali News: लग्नात चांगला मानपान न दिल्याने विवाहितेचा छळ

सासरी नांदत असताना लग्नात मानपान न दिल्याच्या कारणावरून तिला त्रास दिला

एमपीसी न्यूज – लग्नात चांगला मानपान न दिल्याच्या कारणावरून पतीने विवाहितेचा शारीरक व मानसिक छळ केला. तसेच, दुर्धर आजाराने ग्रासलेल्या मुलाकडे दुर्लक्ष केले. या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भीमराव विठ्ठल कोळेकर (रा. नेवाळेवस्ती, चिखली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. याबाबत पीडित महिलेने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला सासरी नांदत असताना आरोपी भीमराव याने लग्नात मानपान न दिल्याच्या कारणावरून तिला त्रास दिला. तसेच, दुर्धर आजाराने ग्रासलेल्या मुलाकडे दुर्लक्ष केले. महिलेने घर बांधण्यासाठी माहेराहून एक लाख रुपये आणले. मात्र, तरी देखील भीमराव याने आणखी पैशाची मागणी केल्याचे फिर्यादी नमूद करण्यात आले आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.