Chikhali News: मेडिकल वेस्ट उघड्यावर टाकल्याने हॉस्पिटलला 25 हजार रुपये दंड

एमपीसी न्यूज – स्वच्छ भारत अभियानांतर्गत क क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे,सहाय्यक आरोग्य अधिकारी बी बी कांबळे व आरोग्य निरीक्षक वैभव केंचनगौडार चिखली परिसरात पाहणी करताना संत तुकाराम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे मेडिकल वेस्ट उघड्यावर टाकताना आढळले. त्यामुळे हॉस्पिटलवर 25 हजार रुपये दंडाची कारवाई करण्यात आली.

नागरिकांनी ओला, सुका व घातक कचरा वेगळा देण्याबाबत महानगपालिकेतर्फे आवाहन करण्यात आले आहे. तसेच वैद्यकीय घातक कचरा योग्य पदधतीने विल्हेवाट लावण्यासाठी व्यवस्था करण्यात आली असतानाही या रुग्णालयाने त्याचे पालन केले नसल्याने व घातक वैद्यकीय कचरा रस्त्यावर टाकल्याने संत तुकाराम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.