Chikhali News: विवाहितेच्या छळप्रकरणी पतीवर गुन्हा

आरोपी याने लग्न झाल्यापासून फिर्यादी यांना मानसिक त्रास दिला. माहेरून पैसे घेऊन ये नाहीतर तुला व तुझ्या घरच्यांना मारून टाकीन अशी धमकी आरोपी पती फिर्यादी विवाहितेला देत असे.

एमपीसी न्यूज – माहेरून पैसे घेऊन ये नाहीतर तुला व तुझ्या घरच्यांना मारून टाकीन, अशी धमकी घेऊन पतीने मानसिक त्रास दिला. तसेच विवाहितेला मारहाण केली. हा प्रकार चिखली येथील नेवाळे मळा येथे 2019 ते 8 ऑगस्ट 2020 या कालावधीत घडला.

याप्रकरणी विवाहितेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती दीपक एकनाथ नेवाळे (वय 38, रा. नेवाळे मळा, चिखली) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी याने लग्न झाल्यापासून फिर्यादी यांना मानसिक त्रास दिला. माहेरून पैसे घेऊन ये नाहीतर तुला व तुझ्या घरच्यांना मारून टाकीन अशी धमकी आरोपी पती फिर्यादी विवाहितेला देत असे. तसेच शिवीगाळ करून हाताने मारहाण करीत असे. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.