Chikhali News: इनोव्हॅटिव्ह वर्ल्ड स्कूलने डिजिटल माध्यमातून साजरा केला स्वातंत्र्यदिन

कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनची स्थिती आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घेऊन राष्ट्रीय सण साजरा करण्यासाठी चिखली येथील इनोव्हॅटिव्ह वर्ल्ड स्कूलने जय्यत तयारी केली होती.

एमपीसी न्यूज – चिखली येथील इनोव्हॅटिव्ह वर्ल्ड स्कूलने भारताचा 74 वा स्वातंत्र्यदिवस डिजिटल माध्यमातून साजरा केला. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी आयोजित केले जाणारे सर्व कार्यक्रम ऑनलाइन सादर करण्यात आले. या कार्यक्रमाचा सराव देखील डिजिटल करण्यात आला.

कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनची स्थिती आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घेऊन राष्ट्रीय सण साजरा करण्यासाठी चिखली येथील इनोव्हॅटिव्ह वर्ल्ड स्कूलने जय्यत तयारी केली होती.

विद्यार्थी सादर करणार असलेले सर्व कार्यक्रमाचे वैयक्तिक व्हिडिओ शिक्षकांना पाठवण्यास सांगितले. त्यानंतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा गुगल मिटद्वारे ऑनलाइन सराव घेतला. स्वातंत्र्य दिनानिमित्त हिंदी भाषण श्लोक भोकरे, किर्थना पिल्लई यांनी केले. इंग्रजी भाषण अंशिका मिश्रा, अर्णिका पाटील आणि सोहम जगदाळे यांनी दिले.

आम्हाला स्वातंत्र्यदिन साजरा करण्यास कोणीही रोखू शकत नाही, अशा भावना विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणांमधून व्यक्त केल्या. झेन कोतवाल, गार्गी गोथे यांनी कोविड बाबत सुरक्षा नियमांची माहिती दिली.

शाळेतील शिक्षिका कॅथरिन यांनी कोरोना योद्ध्यांना समर्पित असणारी इंग्रजी कविता लिहिली. आराध्या चौघले आणि प्रजित गौतम यांनी ती सादर केली. स्पंदन जाधव, मिताक्ष कांबळे, सौम्या तिवारी, मृण्मयी यांनी गायन सादर केले. कुशाल परमार या विद्यार्थ्याने संगीताची साथ दिली.

निया साठे, ईशानवी सिन्हा, स्वरा पाटील, स्पंदन जाधव, मितक्ष कांबळे, अर्णिका पाटील, दिव्यंशु लामखेडे, सार्थक उधने यांनी नृत्य सादर केले.

विद्यार्थी स्वराध्य, अक्षय, अंविका, रुजुता, प्रबुध, रितिका, समर्थ, रुडिका, विहान, अर्णव आणि रितिका राऊत यांनी ‘आम्ही मात करू’ या गाण्याचे इंग्रजी आणि हिंदी भाषांतर सादर केले. अतीक मिश्रा यांनी हिंदी कविता सैनिकांना समर्पित केली.

विद्यार्थ्यांनी कोरोना योद्ध्यांचे आभार मानलेले फोटो, संदेश एकत्रित करून शोभना सिंग यांनी त्याचे संपादन केले. त्याचे यू ट्यूबवर प्रदर्शन करण्यात आले.

शाळेच्या संचालक प्राचार्या कमला बिष्ट यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी सर्व विद्यार्थी आणि पालकांचे आभार मानले. विद्यार्थी अयमान मुजावर आणि देबोश्री भोंडवे यांनी सूत्रसंचालन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.