Chikhali News : कुदळवाडी, चिखलीतील संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवा – दिनेश यादव

एमपीसीन्यूज : कुदळवाडी आणि चिखलीतील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने परिसरातील सोळा ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी महापालिकेचे स्वीकृत सदस्य सदस्य दिनेश यादव यांनी केली आहे. याबाबत त्यांनी अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांना निवेदन दिले आहे.

यावेळी स्वीकृत सदस्य संतोष मोरे, रामचंद्र लांडगे, विजय तापकीर आदी उपस्थित होते.

कुदळवाडी तसेच चिखलीतील रहिवासी भागात मोठ्या प्रमाणात मोठ्याप्रमाणात नागरिकरण झाले आहे. या भागात दाट लोकवस्ती आहे. त्यामुळे परिसरात सर्वच रस्त्यांवर वर्दळ आणि वाहतूक वाढली आहे.

महिला, कामगार, जेष्ठ नागरिक तसेच लहान मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अनेक भागात अडचणी आहेत अनावधानाने अनुचित प्रकार घडल्यास तपास कार्यासाठी पुरेशी यंत्रणा नाही. त्यामुळे या भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची गरज आहे.

चिखली आणि कुदळवाडी भागात संवेदनशील ठिकाणे खूप आहेत. यामध्ये मोरे पाटील चौक, विठ्ठल रुक्मिणी मंदिर, भैरवनाथ मंदिर चौक, पवार वस्ती उड्डाणपूल चौक, इंद्रायणी वजनकाटा चौक, महादेव मंदिर, गणेश मंदिर तथा पोलीस चौकी, मोई चौक, चिखली चौक, चिखली स्मशानभूमी, कुदळ वाडी मनपा शाळा, घरकुल चौक, हरगुडेवस्ती चौक, बालघरे वस्ती चौक, जय गणेश वजनकाटा चौक, डायमंड चौक अशा सोळा ठिकाणांचा समावेश आहे.

या भागातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कॅमेरे बसवावेत, अशी मागणी यादव यांनी केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.