Chikhali News : महिला, युवकांसाठी सोमवारी चिखलीत रोजगार निर्मिती कार्यशाळा -यश साने

एमपीसीन्यूज : पिंपरी-चिंचवड महापालिका, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने महिला आणि युवकांना व्यवसायासाठी अर्थसहाय्य योजनांची माहिती व्हावी, यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष यश साने आणि दत्ताकाका साने प्रतिष्ठान यांच्या पुढाकारातून येत्या सोमवारी ( दि.  8 ) चिखली, मोरेवस्ती येथे रोजगार निर्मिती मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यशाळेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ पवार यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. सोमवारी दुपारी साडे बारा ते सायंकाळी पाच या कालावधीत सावित्रीबाई फुले महापालिका शाळेत ही कार्यशाळा होणार आहे. परिसरातील महिला आणि युवकांनी या कार्यशाळेत उपस्थित राहावे , असे आवाहन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष यश साने यांनी केले आहे.

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, जेष्ठ नगरसेविका मंगला कदम, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा वैशाली काळभोर, संघटिका कविता खराडे, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या शहराध्यक्षा वर्षा जगताप आदी उपस्थित राहणार आहेत.

या कार्यशाळेस महापालिका, उद्योजकता विकास केंद्र, जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत.

या बाबत अधिक माहिती देताना यश साने म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ पवार आणि जेष्ठ नगरसेविका मंगला कदम यांच्या सहकार्याने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती , पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना कार्यशाळेचे आयोजन केले आहे. या माध्यमातून चिखली, मोरेवस्ती परिसरातील महिला आणि युवकांना उद्योग व्यवसायाच्या उपलब्ध संधी आणि त्यासाठी असलेल्या  शासकीय योजना, प्रोजेक्ट रिपोर्ट आदींची माहिती देण्यात येणार आहे.

या कार्यशाळेच्या माध्यमातून स्थानिक महिला आणि युवकांमध्ये रोजगार निर्मिती करण्याचा मानस आहे. त्यासाठी पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.