Chikhali News: घरकुल योजनेतील सदनिकांची मंगळवारी सोडत

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका, केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्याने प्राधिकरण से.क्र.17 व 19 चिखली येथे राबविण्यात येणाऱ्या घरकुल योजनेसाठी लाभार्थ्यांच्या सदनिकांची संगणकीकृत सोडत उद्या (मंगळवारी) काढण्यात येणार आहे.

चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते मंगळवारी सकाळी 11 वाजता सोडत काढण्यात येणार आहे. सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी महापालिका केंद्र शासन व राज्य शासन यांचे सहकार्याने प्राधिकरण से.क्र.17 व 19 चिखली येथे घरकुल योजना राबविण्यात येत आहे.

लाभार्थ्यांच्या सदनिकांची संगणकीकृत सोडत मंगळवारी काढण्यात येणार आहे. पात्र लाभार्थ्यांनी सोडतीसीठी उपस्थित रहावे असे, आवाहन शहर सुधारणा समितीच्या सभापती सोनाली गव्हाणे व समितीतील सदस्यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.