Chikhali News: सासरच्या मंडळींनी जावयाला कार घेऊन दिली नाही म्हणून विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज – सासरच्या मंडळींनी लग्नात काही दिले नाही. तसेच जावयाला नवीन कार घेऊन दिली नाही. या कारणावरून सासरच्या मंडळींनी विवाहितेचा शारीरिक, मानसिक, आर्थिक छळ केला. याबाबत सासरच्या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पती आशुतोष राजेश काकडे, सासू मंजू राजेश काकडे, चुलत सासरे संजय चंद्रकांत काकडे, चुलत सासू संगीता संजय काकडे, आजेसासू शकुंतला चंद्रकांत काकडे, पतीची आत्या जयश्री मोहन खमितकर (सर्व रा. महंमदवाडी रोड, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी 26 वर्षीय पिडीत विवाहितेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार 25 जानेवारी 2019 पासून 17 मार्च 2019 या कालावधीत घडला आहे. फिर्यादी यांच्या आई-वडिलांनी फिर्यादी यांच्या लग्नात सासरच्या मंडळींचा नीट मानपान केला नाही. लग्नात काही दिले नाही. फिर्यादी यांच्या पतीला कार घेऊन दिली नाही. फिर्यादी यांचा पगार सासरच्या लोकांना दिला नाही. तसेच फिर्यादी यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन सासरच्या लोकांनी त्यांचा शारीरिक, मानसिक व आर्थिक छळ केला.

सासरच्या लोकांनी फिर्यादी यांना वारंवार शिवीगाळ करून मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.