Chikhali News : मोबईल टॉवरच्या बीटीएस बॉक्समधून साहित्य चोरीला

एमपीसी न्यूज – मोबईल टॉवरच्या बीटीएस बॉक्स मधून अज्ञात चोरट्यांनी तांत्रिक साहित्य चोरुन नेले. ही घटना 1 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास चिखली येथे घडली.

अनुराग चंद्रभूषण रागी (वय 39, रा. माउलीनगर, दिघी) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या देखरेखीखाली इंडस मोबईल कंपनीचा टॉवर आहे. त्या टॉवरच्या बॉक्सचा दरवाजा तोडून त्यातून 41 हजार 500 रुपये किमतीचे साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले.

त्यामध्ये बेस बॅड दोन, रुस कार्ड पाच, ओ एस सी कार्ड 15, जंफर केबल 12, चार लिंक केबल, एक जीपीएम कनेक्टर, तीन मीटर पोलीकॅब वायर असे साहित्य चोरून नेले आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.