Chikhali news: पालिका चिखलीत उभारणार टाऊन हॉल; महापौरांच्या हस्ते भूमिपूजन

प्रस्तावित इमारतीचे क्षेत्रफळ 5350 चौ.मी. असून त्यामध्ये दुमजली पार्किंग व्यवस्था आहे.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रभाग क्र. 1 चिखली येथील आरक्षण क्र.1/15 येथे टाऊन हॉल विकसित करण्याच्या कामाचे महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते आणि आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितीत आज सोमवारी भूमिपूजन झाले.

सभागृह नेते नामदेव ढाके, ‘फ’ प्रभाग अध्यक्षा योगिता नागरगोजे, नगरसदस्य कुंदन गायकवाड, नगरसदस्या स्विनल म्हेत्रे, साधना मळेकर, माजी नगरसदस्य सुरेश म्हेत्रे आदी उपस्थित होते.

प्रस्तावित इमारतीचे क्षेत्रफळ 5350 चौ.मी. असून त्यामध्ये दुमजली पार्किंग व्यवस्था आहे. एकूण 82 चारचाकी वाहने आणि 150 दुचाकी वाहने पार्किंगची क्षमता आहे. तळ मजल्यावर 350 आसनाचे भव्य प्रेक्षागृह आणि पहिल्या मजल्यावर बाल्कनीत 150 आसनांची व्यवस्था आहे.

तर दुसऱ्या या मजल्यावर पुरुष व महिला यांच्यासाठी अद्यावत व्यायामशाळा, कार्यालय, इत्यादी व्यवस्था आहे. इमारतीचे कामकाज 3 वर्षात पूर्ण होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.