.

Chikhali News: बकरी ईद निमित्त नगरसेवक कुंदन गायकवाड यांनी केले मिठाई वाटप

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – बकरी ईद निमित्त प्रभाग क्रमांक एक मधील मुस्लिम बांधवांना नगरसेवक व फ क्षेत्रीय कार्यालय अध्यक्ष कुंदन गायकवाड व त्यांच्या मित्रपरिवाराने पुढाकार घेत आज मिठाईचे वाटप केले. यामुळे अनेक मुस्लिम बांधवांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.

मुस्लिम बांधवाचे वर्षभरातील दोन महत्त्वाचे सण म्हणजे रमजान ईद व बकरी ईद.   यंदाही बकरी ईद सणावर कोरोनाचे सावट असल्याने पिंपरी-चिंचवड शहरातील मुस्लिम बांधवांनी त्याग, बलिदानाची बकरी ईद घरोघरी नमाज पठण करून साधेपणाने साजरी केली.

प्रभाग क्रमांक एक मधील नगरसेवक कुंदन गायकवाड यांनी आपल्या प्रभागातील मुस्लिम बांधवांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी सर्व मुस्लिम बांधवांच्या घरोघरी आज मिठाईचे वाटप केले. अचानकपणे घरात आपल्या नगरसेवकाकडून आलेली ही त्यांची भेट पाहून प्रत्येक मुस्लिम बांधवांच्या चेहऱ्यावरील आनंद ईदच्या दिवशी द्विगुणित झाल्याचे पाहायला मिळाले. प्रभागातील प्रत्येक नागरिकाच्या सुख दुःखात मी सहभागी असतो. आज बकरी ईद निमित्त मुस्लिम बांधवांचे तोंड गोड करावे अशी माझी व माझ्या कार्यकर्त्यांची इच्छा होती. त्यामुळे आज आम्ही सर्व आमच्या मुस्लिम बांधवांना मिठाईचे वाटप केल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

यासाठी संदीप शेलार, फिरोज शेख, आसिफ शेख, सूरज पठाण, महेश आवटे, आशिष रोकडे, सागर जाधव, रवी गाडीलकर, अनिकेत जाधव, दिग्विजय कामठे, लकी नागटिळक यांनी पुढाकार घेतला.

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1POST DOWn