-MPC-TOP-MOST-BANNER-I

Chikhali News: ‘जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठा’चे शुक्रवारी ऑनलाइन उद्घाटन

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे टाळगाव चिखली येथे उभारण्यात आलेल्या ‘जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठा’चे उद्या (शुक्रवारी) ऑनलाइन उद्घाटन करण्यात येणार आहे. सकाळी साडेअकरा वाजता हा कार्यक्रम होणार असल्याचे महापौर उषा ढोरे यांनी सांगितले. या कार्यक्रमात महापौर दालनातून आपण ऑनलाइन सहभागी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

भागवत धर्माचा प्रसार व प्रचार व्हावा अन् वारकरी सांप्रदायाचे पारंपारीक शिक्षण जनमाणसांना मिळावे, या उद्देशाने हे ‘संतपीठ’ उभारण्यात आले आहे. टाळगाव चिखलीला सांप्रदायिक वारसा असून शेजारीच श्री क्षेत्र आळंदी, देहू या तिर्थक्षेत्रांचे सानिध्यही लाभले आहे. त्यामुळे टाळगाव चिखली येथे राज्यातील पहिले ‘जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ’ पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे उभारण्यात आले.

प्रभाग क्रमांक 1 मध्ये उभारण्यात आलेल्या या संतपीठ उभारणीला 13 मे 2015 रोजी महापालिका सभेत मान्यता दिली होती. संत पीठाचे काम पूर्ण झाले असून उद्या त्याचे उद्घाटन होणार आहे.

महापौर ढोरे म्हणाल्या, ”जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठा’चे उद्या सकाळी साडे अकरा वाजता ऑनलाइन उद्घाटन होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतून ऑनलाइन उद्घाटन केले जाणार आहे. या कार्यक्रमासाठी गर्दी केली जाणार नाही. महापालिकेने पिंपरी-चिंचवडकरांसाठी संतपीठ उभारले आहे. चांगले काम आहे. चांगल्या कामाला प्रोत्साहन देण्याचे माझे कर्तव्य आहे”.

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1POST DOWn