Chikhali News : मोरेवस्ती येथे पांडुरंग साने यांच्या वतीने पाणपोई सुरु  

एमपीसीन्यूज  : जागतिक जल दिनाचे औचित्य साधून भाजप युवा नेते पांडुरंग साने यांच्या पुढाकारातून   चिखली,  मोरेवस्ती येथील  मनपा शाळा क्र. 92  येथे पाणपोईची व्यवस्था करण्यात आली. 

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने कोव्हीड-19 लसीकरण मोहीम चालू आहे. या मोहिमेंतर्गत मोरे वस्ती येथील मनपा शाळा क्र. 92  येथे लसीकरण केंद्र सुरु झाले आहे.  या ठिकाणी  काम करणारे कर्मचारी, डॉक्टर्स व आरोग्य कर्मचारी तसेच लसीकरणासाठी येणारे नागरिक  यांना पिण्याच्या पाण्याची अडचण होती.

_MPC_DIR_MPU_II

सध्या उन्हाळा सुरु असल्याने पाण्याभावी होणारी गैरसोय पाहून भाजप युवा नेते पांडुरंग साने यांनी    जागतिक जल दिनानिमित्त   या ठिकाणी पाणपोई सुरु केली. मान्यवरांच्या उपस्थितीत या पाणपोईचे उदघाटन करण्यात आले. तसेच परिसरात विविध ठिकाणी आणखी पाणपोई सुरु करणार असल्याचे साने यांनी सांगितले.

यावेळी युवराज पवार, सोपान म्हेत्रे, सचिन म्हेत्रे, बाबु खवळे, हरिभाऊ अमृतकर, पोळ दादा आदी मान्यवर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.