Chikhali News: लिफ्ट देण्याच्या बहाण्याने कारमध्ये बसवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

11 जानेवारी रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजता पीडित मुलगी तिच्या मैत्रिणीसोबत चिखली मधील सेक्टर 16 येथून तळई गार्डनमध्ये फिरण्यासाठी जात होती.

एमपीसी न्यूज – मैत्रिणीसोबत चाललेल्या एका अल्पवयीन मुलीला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने एकाने कारमध्ये बसवले. त्यानंतर मुलीवर जबरदस्तीने बलात्कार केला. ही घटना 11 जानेवारी 2020 रोजी घडली असून याबाबत 5 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रवी (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित अल्पवयीन मुलीने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 जानेवारी रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजता पीडित मुलगी तिच्या मैत्रिणीसोबत चिखली मधील सेक्टर 16 येथून तळई गार्डनमध्ये फिरण्यासाठी जात होती. त्यावेळी एका काळ्या रंगाच्या काचा असलेल्या लाल कारमधून आरोपी आला.

त्याने पीडित मुलीला तळई गार्डनकडे घेऊन जातो, असे आमिष दाखवून मुलीला कारमध्ये बसवले. त्यानंतर तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. याबाबत सुमारे नऊ महिन्यांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.