Chikhali News : ‘चिखली मोरेवस्ती भागात रस्त्याची कामे निकृष्ट, ठेकेदाराला ब्लॅक लिस्ट करा’

शिवसेना उपशहरप्रमुख नेताजी काशीद यांनी मागणी

एमपीसीन्यूज : महापालिका प्रभाग क्रमांक 1 मधील चिखली मोरेवस्ती भागातील रस्ते दुरुस्तीची कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत. त्यामुळे या  कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदाराला काळया यादीत टाकावे, अशी मागणी शिवसेना उपशहरप्रमुख नेताजी काशीद यांनी केली आहे.

याबाबत काशीद यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, महापालिका प्रभाग क्रमांक एकमधील रस्ते दुरुस्ती कामाचा ठेका बहिरट कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराला देण्यात आला आहे.

मात्र, या ठेकेदाराकडून चिखली मोरेवस्ती भागात रस्ते दुरुस्तीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले आहे.

_MPC_DIR_MPU_II

कामाच्या दर्जाबाबत संबंधित ठेकेदाराकडे विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच ‘तुम्ही तुमच्या कामाचे बघा, आम्हाला शिकवू नका’, अशी भाषाही त्यांनी वापरली.

त्यामुळे बहिरट कन्स्ट्रक्शन यांनी केलेल्या कामाची पाहणी करून त्यांना काळ्या यादीत टाका. त्यांच्यावर कारवाई करून कामाचे बिलही रोखून धरा, अशी मागणी काशीद यांनी निवेदनात केली आहे.

चिखली मोरेवस्ती भागातील नंदनवन, शांती, माउली आणि शिवकृपा या सोसायट्यांमधील रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची झाली असल्याची काशीद यांची तक्रार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.