Chikhali News : संतपीठाचे काम प्रगतिपथावर

एमपीसी न्यूज –  चिखली (Chikhali News) येथे उभारण्यात येत असलेल्या जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संतपीठाचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. त्याच्या कामकाजासाठी निधीची आवश्यकता आहे. त्यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाकडील तरतुदीतील एक कोटीपैकी 30 लाख रुपये संतपीठाच्या संचालक मंडळाच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिखली येथे जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठाची उभारणी करण्यात येत आहे. संतपीठाचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. या संतपीठामध्ये पाच इमारती असलेले शैक्षणिक संकुल उभारण्यात येत आहे. महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या अधिपत्याखाली या संतपीठाचे कामकाज सुरू आहे. त्यासाठी तरतूद महापालिका माध्यमिक शिक्षण विभागाकडे आहे.

Wadki Nala : वडकी नाला येथे शॉर्टसर्किटमुळे पहाटे गोडाउनला आग

या कामासाठी निधीची आवश्यकता असल्याने माध्यमिक (Chikhali New)  शिक्षण विभागाकडील तरतुदीमधून 30 लाख रुपये जमा करण्याबाबत सुचविले होते. सन 2022-23च्या अंदाजपत्रकात एक कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे. त्यातील अद्यापि काहीच खर्च झालेला नाही. ‘जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ’ या लेखाशीर्षावर असलेल्या एक कोटी तरतुदीपैकी 30 लाख रुपये खर्च करता येईल. संतपीठाच्या संचालक मंडळाचे पिंपरीतील बँक ऑफ बडोदामध्ये खाते आहे. या खात्यावर निधी वर्ग करण्यासाठी महापालिका आयुक्तांनी मान्यता दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.