_MPC_DIR_MPU_III

Chikhali News: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज – अल्पवयीन मुलीवर एका व्यक्तीने जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. मुलगी गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला. याबाबत संबंधित व्यक्तीच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 376 (2), (एच) (एन) (एफ), 354 (अ), लैंगिक अत्याचारांपासून बालकांचे संरक्षण कायदा कलम 4, 5 (जे), (2) (आय) (एन) 6, 8 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

बकरीदी सलामत शेख (वय 39, रा. घरकुल, चिखली) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याप्रकरणी 15 वर्षीय पिडीत मुलीने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार 2019 पासून 25 सप्टेंबर 2020 या कालावधीत घडला आहे. पिडीत मुलीचे आई-वडील घरी नसताना आरोपीने पिडीत मुलीच्या एकटेपणाचा फायदा घेऊन वेळोवेळी तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक लगट केली. तिच्याशी गैरवर्तन करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. पिडीत मुलगी गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1