Chikhali News : मोरे वस्तीतील वीज ग्राहकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवा – नेताजी काशिद

एमपीसीन्यूज : चिखली -मोरेवस्ती येथील वीज ग्राहकांना भेडसावणाऱ्या विविध समस्या सोडविण्याची मागणी शिवसेना उपशहरप्रमुख नेताजी काशिद यांनी आकुर्डी महावितरण कार्यालयाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी शिवसेना भोसरी विभाग संघटक रावसाहेब थोरात उपस्थित होते. चिखली-मोरेवस्ती येथील राजगड पार्क आणि माउली सोसायटीमधील वीज ग्राहक विजेसंदर्भातील विविध समस्यांनी त्रस्त झाले आहेत. वीजपुरवठा अचानक खंडित होणे, व्होल्टेज कमी होणे अशा समस्यांचा सामना येथील ग्राहकांना करावा लागत आहे. वीजपुवठा खंडित होण्याची समस्या तर नित्याचीच झाली आहे.

_MPC_DIR_MPU_II

महावितरण ग्राहकांकडून वीज बिल वसुली करते. वेळेत बिल भरणा केला नाही तर वीज पुरवठा खंडित केला जातो. यात वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई जलद गतीने होते. तशी तत्परता विजेबाबतच्या समस्या सोडविण्यासाठी दिसून येत नाही.

राजगड पार्क आणि माउली या दोन गृहनिर्माण सोसायट्यांमधील विजेसंदर्भातील समस्या सोडविण्यासाठी या भागात दर्जेदार विद्यूत केबल आणि जादा क्षमतेचा नवीन विद्यूत ट्रान्सफार्मर बसवावा, अशी मागणी काशिद यांनी निवेदनात केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.