Chikhali News : साने चौक ते भोसरी बससेवा सुरु करा -दिनेश यादव

एमपीसीन्यूज : चिखली साने चौक येथून जय गणेश साम्राज्य मार्गे भोसरी या मार्गावर पीएमपीएमएलची बस सेवा सुरु करण्याची मागणी स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांनी पीएमपीएमएल प्रशासनाकडे केली आहे.

याबाबत यादव यांनी पीएमपीच्या पिंपरी चिंचवडचे व्यवस्थापक संतोष माने यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले आहे. चिखली येथून भोसरी तसेच पुणे नाशिक महामार्ग व स्पाईन रोड परिसर नोकरी करणाऱ्यांची संख्या मोठी आहे.

_MPC_DIR_MPU_II

मात्र, चिखली साने चौक येथून पुणे नाशिक महामार्ग, जय गणेश साम्राज्य आणि भोसरी येथे जाण्यासही पीएमपीएलची बससेवा उपलब्ध नसल्याने नोकरदार वर्गाची मोठी गैरसोय होते. त्यांना थरमॅक्स चौक येथून बस पकडावी लागते. त्यामुळे वेळ आणि पैसाही जादा खर्च करावा लागतो.

त्यामुळे चिखली साने चौक येथून जय गणेश साम्राज्य मार्गे भोसरी या मार्गावर पीएमपीएमएलची बस सेवा सुरु करावी.

या बससेवेचा सानेचौक, मोरेवस्ती, घरकुल, हरगुडे वस्ती, पवारवस्ती, सेक्टर16, सेक्टर 13, संतनगर या भागातील नोकरदार आणि अन्य प्रवाशांना होईल, असे दिनेश यादव यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.